बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

येत्या ७ जून ला मुख्यमंत्री दिव्यात,विविध ठिकाणी करणार नागरी सुविधांचे भूमिपूजन व लोकार्पण..

अमित जाधव - संपादक

दिवा -वेगाने वाढणाऱ्या दिवा शहराचा तितक्यात कमी वेळात विकास करण्याचा मनी ध्यास असणारे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने दिवाशहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बुधवारी ७ जूनला सायकाळ ५.३० वा. संपन्न होणार आहे तसेच मुख्यमंत्री व खासदार यांचा दिवा शहराच्या वतीने विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या इतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आव्हाहन दिवा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या सुविधांचे लोकार्पण…

नवीन मुख्य जलवाहिनीचे ,(पाणी प्रकल्प योजना २२१ कोटी), दिवा आगासान मुख्य मार्ग (६६ कोटी),आरोग्य केंद्र (मातोश्री १५ लाख), दातीवली व्यायामशाळा (२५ लाख),खुला रंगमंच दातीवली (४० लाख), पॅकेज नंबर २१० (५० कोटी),शाळा क्रं.८० सा बे गाव (१.२५ कोटी),

या सुविधांचे भूमिपूजन..

अगासन देसाई खाडी पूल(६० कोटी),आगरी कोळी वारकरी भवण (१५ कोटी),सामाजिक भवन ,धर्मवीर नगर(५० लाख),पॅकेज नंबर ३९१(१५ कोटी), दातीवली तलाव सुशोभीकरण ( ४.७३कोटी),दिवा शील रोड (२० कोटी),पुरातत्व खिडकालेश्वर मंदिर परिसर (१०.१८ कोटी),देसाई तलाव( १.७५ कोटी)आदी कामाचे भूमिपूजन होणार आहे.
असे दिवा शिवसेनेचे विभागप्रमुख व मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

तसेच मा.नगरसेवक श्री शैलेश पाटील,उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत,मा.नगरसेवक श्री अमर पाटील,मा.नगरसेविका सौ.दिपाली भगत,विभागप्रमुख श्री उमेश भगत,श्री निलेश पाटील,श्री गुरुनाथ पाटील,श्री भालचंद्र भगत, उपशहरप्रमुख श्री गणेश मुंडे,युवती प्रमुख कु.साक्षी मढवी,मा.नगरसेविका सौ.सुनिता मुढे,मा.नगरसेविका सौ.दर्शना म्हात्रे, मा.नगरसेवक श्री दिपक जाधव,विभागप्रमुख श्री चरणदास म्हात्रे, विभागप्रमुख श्री विनोद मढवी,श्री शशिकांत पाटील आव्हाहन आदींनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे