Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जनहितासाठी लढणारे जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ रुग्णालयात दाखल ,खालापूर उपजिल्हा रुग्णालय, सुभाष नगर संरक्षण भिंतीसाठी दि. 10 केले होते आमरण उपोषण…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

जनहितासाठी लढणारे जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ रुग्णालयात दाखल

* खालापूर उपजिल्हा रुग्णालय, सुभाष नगर संरक्षण भिंतीसाठी दि. 10 केले होते आमरण उपोषण

खोपोली (जि. रायगड) / प्रतिनिधी :- मागील दोन महिन्यांपासून आजारी चालत असताना सुध्दा खोपोली नगर परिषदेच्या आडमुठेपणा विरोधात जिवावर उदार होवून 72 वर्षीय जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ यांनी दि.10 जून 2022 पासून खालापूर तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले होते. एक वयस्कर व्यक्ती जनहिताच्या मागण्यांसाठी उपोषण करीत असताना कर्जत प्रातांधिकारी, खालापूर तहसिलदार व खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिवसभर आंदोलकांकडे ढुंकूनही पाहिले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असताना दिवसभर उपाशी राहिल्याने जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ यांची तब्येत खराब झाली असून त्यांना उपचारासाठी खोपोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ रुग्णालयात दाखल झाल्यामुळे खोपोली नगर परिषद प्रशासनाची इच्छा जवळजवळ पूर्ण झाली आहे. जनहिताच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांना वेळ नसल्यामुळेच 72 वर्षीय जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ यांना आपल्या सहकार्यांसह तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषण करावे लागले. त्यातही दिवसभर आजारी जेष्ठ नागरिक आंदोलन करीत असताना मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी आंदोलनाकडे जावून चर्चा करण्याची तसदी घेतली नाही. या आंदोलकांपैकी कुणीही तरी मरावे…कुणाचा तरी जीव जावा, जेणेकरून खोपोली नगर परिषदेच्या अन्यायाविरोधात आवाज उठविणारा कुणीच राहणार नाही, अशीच खोपोली नगर परिषद प्रशासनाची इच्छा होती, त्यामुळेच त्यांनी आंदोलकांची साधी विचारपुस केली नाही.

खालापूर तहसीलदार अय्युब तांबोळी देखील रात्री 7.30 ते 8 वाजता आंदोलनस्थळी दाखल झाले व त्यांनी आंदोलकांच्या 90 टक्के मागण्या पूर्ण करीत उपोषण सोडले. मुख्याधिकारी व खोपोली नगर परिषदेची शुक्रवार दि. 10 जून 2022 रोजी अपूर्ण राहिलेली इच्छा शनिवार दि.11 जून 2022 रोजी जवळजवळ पूर्ण झाली आहे. काल दिवसभर उपाशीपोटी राहिल्याने जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ यांना आज सकाळी पोटाचा चांगलाच त्रास सुरू झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागले आहे.

खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व खोपोलीकरांच्या आंदोलनासाठी जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड संघर्ष समिती, आम आदमी पार्टी खोपोली-खालापूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ऑल इंडिया पॅंथर सेना, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) आदी राजकीय, सामाजिक व पत्रकार संघटनांनी 10 जून 2022 पासून आमरण उपोषण पुकारले होते. खालापूर तहसील कार्यालयाबाहेर अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक तथा रायगड संघर्ष समिती संयोजक जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ, आम आदमी पार्टी खालापूर तालुकाध्यक्ष तथा अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव खलिल सुर्वे, ऑल इंडिया पॅंथर सेना रायगड जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार गोपीनाथ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सतिश रावळ, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, कोकण प्रदेश अध्यक्ष नरेश जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, सरस्वती दत्ता निकम यांनी आमरण उपोषण केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे