Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा शीळ रोडवर खर्डी गाव तलावामध्ये कार बुडल्याची घटना….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने फडकेपाडा तलावामध्ये मारुती सुझुकी सेलरो कार दिवा,खर्डीगाव, येथील फडकेपाडा तलावामध्ये बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत, कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तर मुंबई चेंबुर येथील कारचालक युसुफ पठाण याला तेथील दक्ष व स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेत सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढून जीवनदान दिले ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत सोमवारी रात्री फोन आला, साहेब दिवा, खर्डीगावच्या फडके पाडा कार बुडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन केंद्राचे जवान १-फायर वाहन, १-रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. त्यावर तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनांमधील चालक युसुफ पठाण (२८) याला तेथील स्थानिक नागरिकांनी सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढले व वाहनांमध्ये इतर कोणीही व्यक्ती नसल्याची माहिती स्वतः वाहन चालकाने दिली.
त्यानंतर शीळ पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनाला सोमवारी रात्रीच रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढून वाहन चालकाच्या ताब्यात दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे