मुंबईत नायलॉन मांजा ने पोलिसाचा गेला जीव, कर्तव्य बजाऊन घरी जात असताना काळाचा घाला…
अमित जाधव - संपादक
दिंडोशी पोलिस स्टेशन चे पोलिस शिपाई क्र 111615/ समीर सुरेश जाधव वय 37 वर्षे रा ठी. बिल्डिंग न 77, वरळी बी डी डी चाळ, रूम न 28, वरळी मुंबई हे 15.30 वाजाताचे सुमारास त्यांचे मोटार सायकल वरून कर्तव्य पूर्ण करून त्यांचे वरळी येथील निवासस्थानी जात असताना वाकोला ब्रिज , सांताक्रुज पुर्व मुंबई याठिकाणी मांजा ने गळा चिरल्याने त्यांना खेरवाडी मोबाईल 1 यांनी उपचार कामी तात्काळ सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे,
सदरची माहिती खेरवाडी पोलीस स्टेशन चे व पो नी राजेंद्र मुळीक यांनी 18.06 वाजता मोबाईल द्वारे कळविले आहे.
सायन रुग्णालयात खेरवाडी पोलीस स्टेशन चे पोलिस पथक हजर असून त्यांचे नातेवाईकांना कळविण्यात आलेले आहे तसेच दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सदर ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आलेले आहे.जीवन खरातव,रिष्ठ पोलीस निरीक्षक,दिंडोशी पोलीस स्टेशन यांनी स्पष्ट केले आहे