दिव्यात 444 ग्रुप च उत्कृष्ट रास दांडिया विजेत्याना सोन्याच्या बांगड्या सह शेकडो आकर्षक भेट वस्तू….दिव्यातील एकमेव असा रास दांडिया(काठ्यांचा गरबा)येथे आयोजित…
अमित जाधव - संपादक
दिव्यात यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई , भव्य दिव्य मंडप व सजावट तसेच सायंकाळी भव्य दिव्य असे रास गरब्याचे आयोजन असे चित्र दिव्यात सगळी कडे मोठया प्रमाणावर दिसत आहेत.याचा प्रत्यय म्हणून 444 ग्रुप ने शारदीय नवरात्रौत्सव एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला असून येथे देवीची सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे.
मंडळाचे आधारस्तंभ श्री नरेश पाटील व श्री तैलेश पाटील (मा.सभापती पेन पंचायत समिती)असून भव्य असे रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे दिव्यातील एकमेव असा रास दांडिया (काठ्यांचा गरबा) येथे पहायला मिळत आहे.प्रत्येक दिवशी उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या वीजेत्यास आकर्षक भेट वस्तू ते महिलांना साडी देण्यात येत आहे तसेच लक्की ड्रॉ विजेत्या महिलेला भेट वस्तू म्हणून साडी देण्यात येते.तसेच 444 ग्रुप ने यंदा बक्षिसांची खैरात गरबा रसिकांसाठी आणली आहे 9 मिक्सर, 2 होम थेटर,एक कुलर ,एक अँड्रॉइड मोबाईल तर दोन सोन्याच्या बांगड्या अशा आकर्षक भेट वस्तू असून बक्षिसांची लयलूट करण्यासाठी येथे हजारो महिला वर्ग,युवा वर्ग मुलीमुल,तसेच ज्येष्ठ देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन रास दांडिया खेळत आहेत.आमच्या येथे अत्यंत नियोजपूर्वक व सीसीटिव्ही कॅमेरेच्या देखरेखेखाली सर्व गरबा रसिकांची आरोग्याची काळजी घेत सर्व सुविधायुक्त दांडिया येथे आयोजित करण्यात आला आहे असे मंडळाचे यांनी यावेळी बोलताना सांगितले असे निवेदक नागेश पवार यांनी कळविले आहे