मुंब्र्यात चौदा वर्षापूर्वी भर रस्त्यात खून केलेल्या आरोपीस अखेर आज न्यायालयाने सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा ,मुंब्रा पोलिसांचा अखेर पर्यंतचा पाठपुरावा ठरला यशस्वी..
अमित जाधव - संपादक

मुंब्रा पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 529/2010 भा द वी 302,307,120ब,सह आर्म ऍक्ट 4,25 सह मुंबई पोलीस कायदा 37(१),135 प्रमाणे शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे वय 45 वर्ष ,राहणार मुंब्रा याने कौसा जामा मस्जिद ट्रस्ट ची वादांकीत जागेत बांधकाम केल्याबाबत MRTP कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून तूबा हॉटेल जवळ बोलत बसलेले 4 ते 5 इसम त्यातील फिर्यादीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून मयत यांच्यावर सतूरने मानेवर वार करून खून केला म्हणून गुन्हा शिक्षा सदर आरोपीस भारतीय दंड संहिता कायदा कलम 302,307, व हत्यार कायदा 4, 25 प्रमाणे दोषी ठरवून आरोपीला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा व 13,000 रुपये दंड ,अशी शिक्षा आज न्यायालयाने सुनावली आहे.
मुंब्रा पोलिसांचां सतत पाठपुरावा करत व अथक परिश्रम करून आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करून ठोस कारवाई करत शेवट पर्यंत लढा दिला यात पो नि सादिक बागवान,CID,कोर्ट कारकून – पो हवा. 6892 विद्यासागर कोळी, मुंब्रा आणि पो हवा गिरीश पुराणिक CID यांचे पोलिस दलात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.