ब्रेकिंग
दिव्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत एका जेष्ठ इसमाचा मृत्यू, वाहतूक पोलिसांची कमतरता व अल्पवयीन बाईक स्वार अपघाताचे कारण…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
8
ठाणे, दिवा ता १६ जाने : दिवा शहरातील घडली असून अज्ञात तरुणाच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरात अनेक दुचाकी स्वार आपल्या कर्कश आवाजात भरधाव दुचाकी चालवीण्याचे प्रमाण वाढले असून अश्या दुचाकी स्वरांवर वाहतूक विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया दिवेकरांनी व्यक्त केली आहे.
दिवा-आगासन रोडवर बी आर नगर नाका येथे संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास साईराज वारेकर याच्या भरधाव दुचाकीच्या धडकेत सुनील बळवंत तोरणे (वय 65, राहणार दिवा ) हे रस्ता ओलांडत असताना गंभीर जखमी झाले असता डोक्याला इजा झाल्याने त्यांना केम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यात त्यांचा दोन ते तीन दिवसांनी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर ठिकाणी अपुरे गतिरोधक व वाहतूक पोलिसांची कमतरता तसेच अल्पवयीन बाईकस्वार यामुळे ज्येष्ठ व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे
सदर भरधाव असलेल्या दुचाकीवरील तरुणा विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनचे वपोनि अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दिवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास सावंत करत आहे.
0
2
0
9
7
8



