Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक निर्णय – अनिल परब, परिवहनमंत्री….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक निर्णय – अनिल परब, परिवहनमंत्री.*

मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पहिल्यांदाच एसटीच्या पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे

जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबत नाराजी होती. त्यांचा आक्रोश गेल्या काही दिवसांमध्ये दिसला. त्यामुळे त्यांच्या पगारात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली आहे.
10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात आम्ही 4 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे ज्यांचं मुळ वेतन 16 हजार होतं. त्यांचा पगार मुळ वेतनाच्या 23 हजार 40 रुपये आहे. आता वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार 800 इतका झाला आहे.
20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. ज्याचं स्थूल वेतन 37 हजार 440 होतं त्याचं वेतन आता 41 हजार 40 झालेलं आहे. ज्याचं स्थूलवेतन 53 हजार 280 होतं त्याचं वेतन 56 हजार 880 होईल.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची एकच प्रमुख मागणी होती, ती म्हणजे महामंळाच्या कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं. उच्च न्यायालयाने त्रिस्तरस्तीय समिती बनवली आहे. या समितीला 12 आठवड्यात विलीनीकरणाबाबत अहवाल मु्ख्यमंत्र्यांकडे द्यावा. नंतर मुख्यमंत्र्यांचे म्हणणं त्याला जोडून मग तो अहवाल हायकोर्टात अहवाल जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणी हायकोर्टाच्या समितीच्या अहवालावर अवलंबून आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे