स्त्री शिक्षण, सामाजिक समता, सत्यशोधक विचार रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या दालनात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोतिबा फुले यांच्या बद्दल भावना व्यक्त केल्या.
यावेळी समतेचा, शिक्षणाचा ज्यांनी पाया रचला अशा जोतिबा फुले यांचे कार्य समाजासाठी मोलाचे योगदान आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस त्यांनी समाज्याच्या कल्याणासाठी दिला. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला व सावित्रीबाई फुले यांच्या सोबत खंबीर उभे राहिल्यामुळे सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका झाल्या. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी कार्य केले यांच्या कामातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी प्रतिपादन केले.



