Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

गृहिणींना मोठा फटका,घरगुती गॅस च्या नवीन कनेक्शन साठी 750 रुपयांची वाढ…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ग्राहकांसाठी गॅस कनेक्शनबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी नव्या घरगुती गॅस कनेक्शनच्या किमतींमध्ये वाढ केली असून, आता जास्तीचे ७५० रूपये खर्च करावे लागणार आहेत. १६ जून पासून हा दर लागू होणार असून यापूर्वी गॅस सिलिंडरची किंमत १४५० रुपये होती, मात्र आता तुम्हाला गॅस सिलिंडरचे २२०० रूपये द्यावे लागणार आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांच्यानी १४.२ किलोच्या गॅस सिलिंडर कनेक्शनमध्ये एका सिलिंडरच्या किंमतीत ७५० रूपयांची वाढ केलेली आहे. अशा प्रकारे जर तुम्ही दोन सिलिंडर घेत असाल तर तुम्हाला १५०० रूपये अधिक द्यावे लागतील. तसेच यासाठी ४४०० रूपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रूपये खर्च करावे लागत होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे