टॉरंट हाफ_मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण.
विद्युत बिल कधी हाप होणार :- ठाणेकर
ठाणे :- ठाणे महापालिका तसेच #जितो_ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या #टॉरंट हाफ_मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्या धावपटूंना प्रशस्तीपत्र, चषक आणि पारितोषिक देऊन सन्मानित केले.
ठाणे महापालिका आणि जितो ट्रस्टच्या वतीने ठाण्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने ८०० खाटांचे #कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याच कॅन्सर रुग्णालयाच्या निर्मितीसाठी अपेक्षित असलेल्या निधीचे संकलन करण्यासाठी #रन_फॉर_कॅन्सर या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या ५ हजार ठाणेकर नागरिकांचे मनापासून आभार मानले. विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा आणि त्यांच्या टीमने या मॅरेथॉनमध्ये हिरीरीने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.
याप्रसंगी अभिनेते आणि वयाच्या पन्नाशीत #ट्रायथलॉन स्पर्धा जिंकणारे मिलिंद सोमण, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त अशोक बुरपुले, जितो ट्रस्ट आणि #एमसीएचआय_क्रेडाई ठाणेचे अजय आशर तसेच स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे करोना काळात टोरन्ट पॉवर ने विद्युत बिलात कोणती ही कपात नकरता उलट वाडीव बिलं ग्राहकांना पाठवली असल्याचा आरोप होत असतानाच हाप मेरोथॉन प्रमाणे विद्युत बिलं ही हाप कधी होणार असा सवाल ठाणेकर करतांना दिसत आहे.


