Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा धक्का,ते नगरसेवक नाहीत ते तर त्यांचे वयक्तिक कार्यकर्ते…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी आपल्या मातोश्री या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, जेवढे नगरसेवक तिकडे गेले आहेत ते नगरसेवकच नाहीयेत. महत्वाचं म्हणजे आता महापालिका अस्तित्वात नाहीयेत. त्यामुळे हे म्हटलं तर हे त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात की त्यांच्याच आग्राहामुळे मी माझ्या निष्ठावान शिवसैनिकांना बाजूला ठेऊन त्यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती. असे जे काही त्यांचे लोक असतील ते तिकडे गेले असतील, असं उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी आपल्या मातोश्री या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.कायद्याच्या दृष्टीने धनुष्यबाण कुणी हिरावून घेऊ शकत नाही. पण नुसत धनुष्यबाण चिन्ह असलेल्या माणसाचा लोक मतदानात विचार करता. धनुष्यबाण कुणी दूर करु शकत नाही. नगरसेवक गेले पण महापालिका अस्तित्वात नाही. गेले ते त्यांचे समर्थक होते, असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेने आजवर साध्या माणसाला मोठे केले आहे याचा मला अभिमान आहे. ज्यांना मोठेपण मिळाले ते गेले. साधी माणसं जोपर्यंत शिवसेनेसोबत तोपर्यंत शिवसेनेला धोका नाही, असंही ठाकरेंनी सांगितलं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे