Breaking
ब्रेकिंग

कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण आणि १४ गाव परिसरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित ,डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण आणि १४ गाव परिसरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आज पिंपरी गावात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी १४ गावांमध्ये आत्तापर्यंत मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कामे झाली असून ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांनी घेतला. त्यामुळे भविष्यात या गावांचा नियोजनबद्ध विकास करणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगितले. या माध्यमातून गावांचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच रोजगार निर्मिती देखील होणार आहे. गावांमध्ये पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचेही काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच १४ गावांमधून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केले आहे

याप्रसंगी लोकसभा निरीक्षक, दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्त्वाखाली १४ गावातील उबाठा गटाच्या कैलास येंदारकर, विनोद पाटील, प्रभाकर येंदारकर, कैलास पाटील आणि इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेचा भगवा ध्वज देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले आणि जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हा संघटक लता पाटील, तालुकाप्रमुख महेश पाटील, तालुका संघटक अर्जुन पाटील, माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील, भाजपा युवा मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, पिंपरी गावातील शिवसेना पदाधिकारी किसन जाधव, जयेश जाधव, भरत भोईर, लक्ष्मण जाधव, नारायण जाधव, मंगेश जाधव, मनसेचे पदाधिकारी विजय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे