बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेत प्रवाश्याला फटका मारून मोबाईल चोरी…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता ११ जून : दिवा रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेस रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका तरुणाच्या हातावर चोरट्याने फटका मारून त्यांच्या हातातील ७२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे येथे राहणारा ३७ वर्षीय प्रवासी मंत्रालयात कामानिमित्ताने आला होता सायंकाळी काम पूर्ण झाल्यानंतर त्याने सीएसएमटी रेल्वे स्थानकातून प्रगती एक्स्प्रेसमधील सामान्य डब्यातून प्रवास सुरु केला. तो रेल्वेगाडीच्या दारात बसून प्रवास करत होते. त्यावेळी त्याच्या हातामध्ये मोबाईल आणि पॉवर बँक हे उपकरण होते. दिवा रेल्वे स्थानकापासून रेल्वेगाडी पुढे जात असताना अचानक एका व्यक्तीने त्याच्या हातावर फटका मारला. या घटनेत त्याच्या हातातून मोबाईल आणि पॉवर बँक खाली पडले त्यानंतर त्या चोरट्याने मोबाईल आणि पॉवर बँक घेऊन तेथून पळ काढला.

प्रकरणी संबंधित रेल्वे प्रवासी कर्जत रेल्वे स्थानकात उतरुन त्याने तेथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोबाईलची किंमत ७२ हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे