ब्रेकिंग
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवन्यावर निवडणूक प्रशासनाकडून कडक कारवाईचा इशारा..
अमित जाधव - संपादक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अशा अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला. मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्रमांक 17 चा अर्ज भरावा आणि ओळखपत्र दाखवून मतदान करावे, असा खोटा मेसेज व्हायरल होत आहे. यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले.