ठाणे ता 20 ऑगस्ट : आधार सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे या पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० ऑगस्ट रोजी नुरी हॉल, मखमली तलाव, चंदनवाडी, ठाणे येथे अनेक मान्यवर, प्रशासकीय अधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. प्रसंगी संस्थेची अद्यावत स्थिती, पाच शाखांचे ७८४८ सभासद संख्या, संस्थेचे खेळते भांडवल १०७ – २५ कोटी, संमिश्र व्यवसाय १५४ कोटी व निव्वळ नफा १-०८ कोटी झाला असून संस्थेने “अ” वर्ग राखला आहे. प्रसंगी इतिवृत मंजूर करणे, लेखापरीक्षण करणे, दिलेली व वसूल कर्जे, संस्थेचा नफा व तोटा तसेच यावेळी १३% लाभांश मंजूर करण्यात आला तर नवीन सभासद व संचालक सादर करण्यात आले.आठ हजार सभासद असलेल्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेस मा. आमदारांसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांचा अध्यक्ष भरतशेठ दांगट यांच्यासह इतर उपस्थित संचालकांकडून सन्मान करण्यात आला.
प्रसंगी मा. आमदार बाळासाहेब दांगट (जुन्नर), शिवाजीराव दावभट (डेप्युटी कलेक्टर मुंबई) रविकांत हांडे, विलास डुंबरे, विजय नांद्रेकर, प्रदीप शिंदे,महेश कदम, किसनराव भोसले, तानाजी पानसकर, संतोष मुळे, अजित पाटील, सुधीर कोटक, दादाभाऊ रेपाळे, रमेश खामकर, विकास वाघमारे, भाऊसाहेब शेळके, सौ शोभा वामन, सौ दमयंती पाटील यासह अनेक ठेवीदार सभासद उपस्थित होते प्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. शैलेजा मस्करे यांची सुकन्या तनुजा सुरेश मस्करे-सदाकाळ यांनी एमपीएससी परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल आमदार दांगट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



