Breaking
ब्रेकिंग

आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा मनसेचा सामाजिक उपक्रम, आमदारांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रस्त्यावरील खड्डे बुजवले…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मनसेचे स्थानिक आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवा मनसेकडून दिवा स्टेशन परिसरातील दिवा गावात जाणाऱ्या आणि साबे गावात जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी आमदार राजू पाटील यांचा वाढदिवस मनसे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करत असतात.

मात्र यावर्षी आमदार राजू पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावून शहर विद्रुपीकरण करण्याऐवजी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आवाहन केले होते. रस्त्यांवर असलेल्या खड्यांकडे प्रशासना कडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना येता जाता खूप त्रास होतो. या होणाऱ्या त्रासातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा या हेतूने हे आवाहन राजू पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नैतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी दिवा पश्चिमेला दिवा गावात जाणाऱ्या आणि दिवा पूर्वेला साबे गावात जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे खडी आणि भुसा टाकून बुजवले.

मनसे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे यांनी या उपक्रमास आवर्जून भेट दिली. यावेळी मनसे शहर सचिव तेजस पोरजी, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, विभाग सचिव परेश पाटील , महिला शाखाध्यक्ष नम्रता म्हस्के-खराडे, उपशाखाध्यक्ष राणी वाघमारे हे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे