ब्रेकिंग
कपिल रोडे यांची शिवसेना प्रणित भटके विमुक्त जाती जमाती च्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
ठाणे-शिवसेना प्रणित भटके विमुक्त जाती जमाती सेना महाराष्ट्र बालासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेने मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यातील समाजसेवक कपिल रोडे यांची ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांचां मी सक्रिय प्रचार व प्रसार करून शिवसेना पक्ष वाढीस सर्वांना सोबत घेऊन कार्य करील असे यावेळी कपिल रोडे यांनी बोलताना स्पष्ट केले.
प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी नियुक्ती पत्र देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अनेक मित्र परिवार व मान्यवर यांच्या कडून देखील त्यांचे अभिनंदन होत आहे.
0
2
0
9
7
4



