Breaking
ब्रेकिंग

दिव्याची विदिशा बनसोडे हीची हाँगकाँग येथे किकबोक्सिंग या जागतिक स्पर्धेत निवड…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे – दिवा शहरातील सुपुत्री विदिशा बनसोडे हीची हाॅगकोंग येथे आयोजित इन्टर नेशनल वुशो ( किकबाॅक्सिंग ) जागतीक स्पर्धे करिता निवड झाली असुन आपल्या देशाचे व दिवा विभागाचे नावलौकीक संधीचे सोने करण्याची तिला संधी उपलब्ध करून मुंबई नगरीतील वुशो ॲकेडमीचे इन्टर नेशनल प्रशिक्षक दैवेन्द्रजी कारले व अनुजजी पांडे यांच्या अतुल्य वुशो प्रशिक्षणाच्या माध्यमातून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठिक १० : ३० वाजता दिवा येथुन मुंबई इन्टर नेशनल एअरपोर्ट हाॅगकोंग साठी रवाना झाली आहे

विदिशा हिने अनेक स्पर्धेत पदक कमावले असून या स्पर्धेत देखील ती पदकाची कमाई करेल व असे तीच्या निकटवर्तीयांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले तसेच कुटुंब व मित्र परिवार यांच्या कडून तिचे अभिनंदन करत प्रत्येक खेळाडूने घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्राचे नाव लौकिक करावे असे यावेळी तिच्या वडिलांनी बोलताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे