Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कल्याणच्या ताल बार मध्ये धिंगाणा पोलिसासह सहा जणांवर गुन्हा…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

कल्याणच्या ताल बार मध्ये धिंगाणा
पोलिसासह सहा जणांवर गुन्हा

कल्याण : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरु ठेवा, अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ताल बारमध्ये सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

काय आहे प्रकरण?

टिटवाळा भागात राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ताल बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखरसोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडे, मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

नेमकं_काय_घडलं?

रात्री बारमध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी अजून गाणे सुरू ठेवावा अशी मागणी बार मॅनेजरकडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ आहे, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच या ६ जणांनी बार मध्ये धिंगाणा सुरू केला. जवळपास एक तास हा धिंगाणा सुरू होता.

गाणं न वाजवल्यास बिल न भरण्याची धमकी.

गाणे सुरू करणार नाही तर आम्ही बिल भरणार नाही असे धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसन्स रिवॉल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहाजण बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. त्वरित याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. आज या ६ जणांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी देविदास ढोले हे करीत आहेत. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे