पत्नीने व्हिडीओ कॉल वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने पतीची आत्महत्या…..
अमित जाधव-संपादक
पत्नीने व्हिडीओ कॉल वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने पतीची आत्महत्या.
बदलापूर ता 19 मार्च : धुलिवंदनाच्या दिवशी बदलापुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. माहेरी असलेल्या पत्नीने मुलीला घरी न आणल्याने आणि व्हिडीओ कॉल वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नैराश्येच्या भरात हे पाऊल उचलल्याच समजत आहे. बदलापूरच्या वडवली परिसरात शंकर जाधव, वडील ,आई, पत्नी, आणि 2 महिन्याच्या लहान मुलीसह राहत होता. मात्र पतीने आई वडिलांसोबत न राहता वेगळे राहावे अशी शंकरच्या पत्नीचे म्हणणे होते. त्यावरून त्याच्यात वारंवार वाद होत होते. असे मयत शंकरच्या नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान शंकरने पत्नीला फोन करून मुलीला घरी घेऊन ये असे सांगितले, मात्र पत्नीने तुम्ही घ्यायला या म्हणत स्वतः यायला नकार दिला. यानंतर शंकरने पत्नीला आत्महत्या करत असल्याचा फोन करत रागाच्या भरात शंकरने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.


