नागपुरात बर्ड फ्लू फोफावत असून पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर आहे. इथे बर्ड फ्लूने शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. भोपाळ प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेल्या कोंबड्यांचे नमुन्याचा अहवाल आला. यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने होत असल्याचे समोर आले आहे.