
श्रीएकवीरा देवी संस्थानकडून डीजेवर बंदी
लग्न, वाढदिवस, मिरवणुकीत मोठ्या कर्णकश आवाजात डीजे वाजवले जाते. पण या डीजेमुळे आतापर्यंत अनेकांना हार्ट अटॅक आला आहे. तर उच्च रक्तदाब, मिरगीचा आजार असलेल्या रुग्णांना तसेच वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे आता यवतमाळच्या महागांव तालुक्यातील श्रीएकवीरा देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळांनी डीजेवर बंदी घातली आहे. संस्थानच्या मंगल कार्यालयात ही बंदी असणार आहे.