Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

५ दिवसात मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी १४० जण पाॅझिटिव्ह…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मुंबई – मुंबईमध्ये डिसेंबरपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. या प्रसाराला रोखण्याचे काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. गेल्या ५ दिवसात मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील १४० जण पाॅझिटिव्ह आढळले ( KEM Hospitals Doctors Covid Positive ) आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक बरे झाले आहेत.
मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. मुंबईत दिवसाला कोरोनाचे २० हजार रुग्ण आढळून आले आहेत. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून खासगी तसेच पालिका, सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. अशा रुग्णांवर उपचार करताना मुंबई महापालिकेचे प्रमुख रुग्णालयापैकी एक असलेल्या केईएम रुग्णालयात १ ते ५ जानेवारी या ५ दिवसात १४० जण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यात निवासी डॉक्टर ८१, शिकाऊ डॉक्टर ३५ व विविध विभागांतील २४ असे १४० जण कोरोनाबाधित आढळल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ होताना दिसत ( Covid Outbreak In Maharashtra ) आहे. गुरुवारी मागील 24 तासांत 36 हजार 365 बाधितांची नोंद ( New Covid Cases In Maharashtra ) झाली. त्यापैकी मुंबईत सुमारे 20 हजार रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी झाला आहे. आज एकूण 13 रुग्ण दगावले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे 79 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचे आठ हजार 907 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे