दिवा डंपिंग ग्राउंड विरोधात भाजप चे रोहिदास मुंडे आक्रमक, डंपिग ग्राउंड बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा….
अमित जाधव - संपादक
दिवा: सुमारे एक वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेची निवडणुक जवळ आली असताना, दिवा डम्पिंग बंद केले सांगता. मात्र अद्यापही दिव्यात कचरा टाकण्याचे थांबवत नाही. आजही डम्पिंग सुरूच आहे. त्यामुळे पहिल्यांदा ५ लाख दिवेकारांची फसवणूक थांबवा, तसेच आठ दिवसात डम्पिंग बंद करा, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात आणि खोटी आश्वासनप्रशासनाविरोधात आणि खोटी आश्वासन देऊन दिवा शहरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात दिवावासीयांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदनाद्वारे दिला.
दिवा शहरात ठाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत इंपिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता, मागील जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तयार झाले, तेव्हा डम्पिंग ग्राउड बंद झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. भंडारली येथे महापालिकमार्फत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी निधीही खर्च केला आहे. परंतु आजही दिवा शहरात मोठ्या प्रमाणात डम्पिंगच्या गाड्या चालू आहेत. असे मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय ठाणे शहरातील कचरा दिवा शहरात आजही टाकला जातो. महापालिकेची आश्वासने ही निवडणूकसाठी असतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना येथील पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी महापालिका म्हणून खेळत असल्याचा आरोपही केला आहे. तर, डम्पिंग बंद झाले सांगून येथील ५ लाख नागरिकांची फसवणूक करत आहात डम्पिंग बंद करतो असे सांगून ते बंद करत नाहीत. दिव्यातील पाच लाख लोकांच्या भावनाशी ठाणे महानगरपालिका प्रशासन खेळत आहे. असेही म्हटले आहे.
तर, महापालिका सत्तेतील दिव्यातील माजी नगरसेवकांच्या दबावापोटी दिव्यातील पाच लाख लोकांची फसवणूक करत आहात का?त्यांना निवडणूकी मध्ये फायदा व्हावा म्हणून डम्पिंग बंद करण्याचे खोटे आश्वासन जनतेला देत आहात. महापालिका आयुक्त म्हणून महापालिकेनेच घेतलेल्या डम्पिंग बंदच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून दिवा शहरातील डम्पिंग ग्राउंड येत्या आठ दिवसात बंद करावा अन्यथा महापालिका प्रशासना विरोधात आणि खोटी आश्वासन देऊन दिवा शहरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात दिवावासीयांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल इशारा भाजपचे मुंडे यांनी निवेदनात दिलेला आहे.
………