बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील शाळांची मनमानी फी वसुली मोडून काढणार – दिवा मनसेचा इशारा*

अमित जाधव-संपादक

*दिव्यातील शाळांची मनमानी फी वसुली मोडून काढणार – दिवा मनसेचा इशारा*

आज बि.आर.नगर येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल येथे प्रायमरी वर्गात ऍडमिशन घेतलेल्या एक पालकाच्या पाल्याला वर्गात बसू न दिल्याची तक्रार मनसे पदाधिकाऱ्यांना आली होती. सदर पालकाने नवीन ऍडमिशन घेताना ७ हजार रुपये ऍडमिशन फी भरली आणि वार्षिक फीचे १८ हजार रुपये दोन टप्यामंध्ये भरण्यास सांगण्यात आले होते, पण आज अचानक शाळा प्रशासनाने संपूर्ण फी न भरल्यास शाळेत मुलांना बसू न देण्याचे आदेश देऊन मुलांना घरी पाठवले. याच विषयावर मनसे विभाग अध्यक्ष *श्री. तुषार भास्कर पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली *उपविभाग अध्यक्ष परेश पाटील , शाखाध्यक्ष शैलेंद्र कदम , महिला शाखाध्यक्षा अंकिता कदम, मनविसे शाखाध्यक्ष गौरव कदम* यांनी शाळा प्रशासनाची भेट घेवून संबंधित प्राचार्यांना याचा जाब विचारून त्या पाल्याला ऍडमिशन घेताना ठरल्याप्रमाणे शाळेत घेण्याची तंबी दिली.

त्याचवेळी सेकंडरी माध्यमात शिकणाऱ्या पालकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना धक्कादायक माहिती दिली, ज्या मुलांची मागील दोन वर्षांची फी भरली गेली नव्हती ती फी पालकांनी कर्ज काढून भरली , काही पालकांनी चालू शैक्षणिक वर्षाची देखील ६ महिन्यांची ( 1st सेमिस्टर) फी आगाऊ भरली असल्याचे सांगितले. तरीदेखील ऑक्सफर्ड शाळेकडून पालकांना संपुर्ण वर्षाची फी एकत्रच भरण्यास किंवा पुढच्या सेकंड सेमिस्टर च्या फि चा चेक आगाऊ देण्यास सांगितले,तसे न करणाऱ्या पालकांच्या मुलांना शाळेत बसू न देता घरी पाठवले जात असल्याचा गंभीर प्रकार पालकांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मनसे विभाग अध्यक्ष *श्री. तुषार भास्कर पाटील* यांनी ऑक्सफर्ड शाळेचे संचालकांची आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेऊन चर्चा केली. सदर बैठकीत तुषार पाटील यांनी संपूर्ण वर्षाची फि एकत्र घेण्याचा किंवा पालकांकडून आगाऊ PDC चेक घेण्याला तीव्र विरोध केला. बैठकीअंती खालील विषयांवर संचालकांकडून मंजुरी घेण्यात आली.

१) ज्या पालकांनी या वर्षीची पहिल्या सेमिस्टर ची फी भरली आहे त्यांना दुसऱ्या सेमिस्टरच्या फी चा आगाऊ PDC चेक देण्याची सक्ती करू नये.

२) ज्या पालकांची मागील थकबाकी पूर्ण भरलेली आहे, पण या वर्षीची पहिल्या सेमिस्टर ची फी भरलेली नाही त्यांना फि भरण्यासाठी किमान ३ महिन्याचा वेळ देण्यात यावा.

३) ज्या पालकांची कोरोना काळातली फी बाकी आहे त्या मुलांच्या शाळेचे नुकसान न करता त्यांना वर्गात बसू द्यावे आणि पालकांना त्यांची मागील थकीत फी भरण्यासाठी अजून १ महिन्याची मुदत देण्यात यावी.

कुठल्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती तुषार पाटील यांनी शाळा संचालकांना केली. दिव्यातील इतर शाळांमध्ये देखील अशाच प्रकारे सक्तीची मनमानी फि वसुली होत असल्यास पालकांनी मनसे कार्यालयात किंवा आपल्या जवळच्या महाराष्ट्र सैनिकांशी संपर्क साधण्याचे आवाहन मनसे विभाग अध्यक्ष तुषार पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे