दिवा शहरातील गणेशपाड्यातील रस्ता अखेर होणार पूर्ण,स्थानिक रहिवाशी आनंदित…. चाकरमानी व रहिवासीयांना दातीवली स्टेशन गाठण्यासाठी मिळणार हक्काचा रस्ता… मा. उपमहापौर रमाकांत मढवी
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 15 जून : अखेर दिव्यातील गणेशपाड्यातील शेकडो चाकरमानी व रहिवाश्यांना दातीवली स्टेशनला जाण्यासाठी मिळणार हक्काचा रस्ता. दिव्यातील गणेशपाडा येथील अयप्पा हौ. सोसायटी ते दातीवली रेल्वे स्टेशनला पूर्वनियोजित होणारा मुख्य रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फ बाजूला गटारे व सिमेंट काँक्रिट रस्ता होणार असल्याने दातीवली रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी चाकरमानी, कोकणात जाणारे प्रवाशी व स्थानिक रहिवासी यांना याचा फायदा होणार असून प्रसंगी शिवसेनेचे उप. महापौर रमाकांत मढवी, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील हे विभागप्रमुख तर राजेश पाटील, सचिन चौबे, मनोज गुप्ता, सदाशिव पाटील हे उप विभाग प्रमुख तसेच गणेश गायकवाड व राजेश पाटील हे शाखाप्रमुख यांच्यासह ठाणे मनपाचे दीपक माने (कार्यकारी अभियंता) अविनाश वसावे (उप अभियंता) अदित्य डावखर (कनिष्ठ अभियंता) दीपक गुजराथी व डोंगर परदेशी (स्वच्छता निरीक्षक) उपस्थित होते.