
दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट 20 जानेवारीला मिळणार
बारावी बोर्डाची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर दहावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. अशातच दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवार (20 जानेवारी) पासून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट www.mahasscbord.in वर उपलब्ध होईल. शाळेकडून मुद्रित स्वरुपात तुम्हाला हॉल तिकिटाचे वाटप होईल. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. तर 15 मेपर्यंत या परीक्षांचे निकाल लागण्याची शक्यता आहे.