बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यातील वाहतूक कोंडी व रेल्वेच्या इतर सुविधा साठी आ.राजू पाटील यांच्या नियोजित दौरा….

अमित जाधव - संपादक

दिव्यातील वाहतूक कोंडी व रेल्वेच्या इतर सुविधा साठी आ.राजू पाटील यांच्या नियोजित दौरा….

दिवा रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे दिवावासीय हैराण झाले आहेत. याबाबत आमदार राजूदादा पाटील यांनी ठाणे महानगर पालिका अधिकारी, रेल्वे पोलीस व अधिकारी, मुंब्रा वाहतूक पोलीस, मुंब्रा पोलीस आणि रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासोबत संयुक्त पाहणी केली. यावेळी दिवा ग्रामस्थ देखील उपस्थित होते. सदर वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या सूचना अंमलात येऊन लवकरच दिवेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होईल अशी आशा व्यक्त केली.
तसेच दिवा स्थानकाच्या पूर्व भागात तिकीट खिडकी नसल्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता. या भागात तिकीट खिडकी सुरू व्हावी अशी त्यांची मागणी होती. सदर मागणीनुसार या भागात लवकरच तिकीट खिडकी सुरू होत आहे. आज नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिकीट घराची पाहणी केली.
दिवावासीयांची सदर मागणी पूर्ण व्हावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन आमदार राजूदादा पाटील यांनी त्यांना लेखी निवेदन दिले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल रेल्वे प्रशासनाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
दिवा स्थानक पूर्व भागातील नवीन तिकीट घराचा लवकरच शुभारंभ होणार आहे. त्यानंतर तिकीटासाठी स्थानकाला वळसा घालण्यासाठी जाणारा प्रवाशांचा वेळ वाचेल. यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले याचे समाधान आहे.असे या वेळी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे