मुंबईत इमारतीला भीषण आग लागून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 15 जण गंभीर…..
अमित जाधव-संपादक
*⭕️मुंबईत इमारतीला भीषण आग लागून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 15 जण गंभीर.*
मुंबई, ता 22 ( संतोष पडवळ) : मुंबईतील ताडदेव परिसरातील कमला या 20 मजली इमारतीला ही भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकूण 15 जण जखमी झाले असून, यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत.
इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा दाखल झाल्या होत्या. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन जवानांकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही. ताडदेव परिसरातील भाटीया रुग्णालयाच्या जवळ कमला ही बहुमजली इमारत आहे. दरम्यान ही आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा करण्यात आली. सध्या 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
आगीच्या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे. या आगीमध्ये दहा जण जखमी झाले असून यातील काही जण गंभीर जखमी आहेत. या जखमींना उपचारांसाठी जवळच्या भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तर इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरुवातीला करण्यात आलं आहे. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.