ब्रेकिंग
कल्यान डोंबिवली मधील त्या 65 इमारती तीन महिन्याच्या कालावधीत तोडण्याचे आदेश.. मुंबई हायकोर्ट
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
डोंबिवलीत पाच वर्षाच्या कालावधीत बांधकामधारकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट इमारत बांधकाम परवानगी कागदपत्रांच्या आधारे ६५ बेकायदा इमारती उभारल्या. या बेकायदा इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या इमारती अधिकृत असल्याचे दाखवून या इमारतींमधील सदनिका घर खरेदीदारांना विकल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे या इमारतींची उभारणी करून नागरिकांची फसवणूक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी या सर्व बेकायदा इमारती येत्या तीन महिन्याच्या कालावधीत तोडण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले आहेत.
यामुळे रहिवासी व बिल्डर लॉबी मध्ये तनवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
2
0
9
7
4



