युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स काऊन्सिल भारत ,महाराष्ट्र प्रदेश ,पालघर जिल्हा, ह्युमॅनिटी फाउंडेशन पालघर कडून आदिवासी पाडयाना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप……
अमित जाधव-संपादक
यनिव्हर्सल ह्यूमन राईट्स काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुणजी बाकोलिया,राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ.सौ.सुमन जी मौर्य,आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ,महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा ताई कदम यांच्या मार्गदर्शनानुसार पालघर जिल्हा व ह्युमॅनिटी फाउंडेशन पालघर* यांच्या संयुक्त विद्यमाने आज
दि. 4/10/21 रोजी आदिवासी दुर्गम भागात *कोंढाणा सातीपाडा* या गावात 100% आदिवासी लोक राहात आहे,येथे गरीब व गरजू लोकांना जुने कपडे वाटप करण्यात आले 15 गरोदर मातांना. एक साडी सफरचंद, केळी,chocos , पॉकेट प्रत्येकी 1.1 देण्यात आले. तसेच लहान मुलांना कपडे व मोठ्या मुलांना शर्ट पॅन्ट टी-शर्ट, मोठ्या मुलींना कपडे दिले ,या कार्यक्रमासाठी डॉ.दिलीप सोनवणे ,डॉ रूपाली सोनवणे यांनी फ्रुट्स दिले. त्याप्रसंगी *UHRC च्या पालघर जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ.सायली संखे,फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीयुत मकसूद मेमन, अंजली भानुशाली , मनस्विनी किणी, निलेश यादव, भुवन थापा, ऐश्वर्या राऊत, आदिती चौधरी,विक्रांत मुकणे* उपस्थित होते.


