ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्यावर समाजसेवक योगेश मुंधरा यांचे गंभीर आरोप….
अमित जाधव-संपादक
*ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्यावर समाजसेवक योगेश मुंधरा यांचे गंभीर आरोप*
*आरोप खोटे ठरल्यास माझ्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी-योगेश मुंधरा(समाजसेवक)*
ठाणे जिल्हा पत्रकार संघ चे अद्यक्ष संजय पितळे यांच्यावर पत्रकार संघाचे बनावट लेटर पॅड,व इतर पेपर बनवून संघाची फसवणूक केली आहे तसेच ठाणे महापालिकेत राहण्यासाठी कुठलीही सोय नाही म्हणून खोटं हमीपत्र देऊन ठाणे महापालिकेकडून फ्लॅट मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.तुटपुंजा व्यवसाय करणारा व्यक्ती इतकी संपत्ती कशी गोळा करू शकतो यासाठी समाज सेवक सुभाष ठोंबरे यांनी देखील क्रित्येक वर्षे ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारीऱ्यांना पत्रव्यवहार केले होते तरीही काही राजकीय नेते व भ्रष्टअधिकाऱ्यांच्या दबावामुळे कोणतीच कारवाई होत नाही ठाण्याच्या अनेक पोलीस स्टेशनला वेगळवेगळे गुन्हे दाखल असताना देखील संजय पितळे यांना महाराष्ट्र शासनाकडून अधिस्वीकृती देण्यात आली आहे असे मुंधरा यांनी सांगितले.लवकरात लवकर ठाणे जिल्हा पत्रकार संघ व इतर सामाजिक कार्यकर्ते ,काही जैष्ठ पत्रकारांचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्त व ठाणे पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन पितळे यांच्यावर योग्यती कारवाई लवकरात लवकर करावी अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करू असे पत्रकार परिषदेत समाजसेवक योगेध मुंधरा यांनी स्पष्ट केले