दिव्यात सभाजी ब्रिगेड च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर ,शेकडो नागरिकांनी घेतला लाभ..
अमित जाधव - संपादक
रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेड दिवा शहरच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले. शिवश्री. सुधीर दादा राजेभोसले यांच्या मार्गदर्शना खाली हे शिबिर राबवण्यात आले.
आरोग्य शिबिरला दिवा शहरतील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मध्ये मोफत ECG, मोफत रक्त तपासणी, मोफत थायरॉईड चाचणी, कमी किंमतीत चष्मा वाटप असे अनेक उपक्रम राबविणात आले. दिव्यातील जनतेने या सर्व उपक्रमांचा लाभ घेतला.
शिवश्री सुजय सावंत ठाणे महानगर अध्यक्ष, शिवश्री. तुळशीराम शिर्के ठाणे महानगर उपाध्यक्ष, शिवश्री. संभाजी कदम दिवा शहर अध्यक्ष, शिवश्री. आयुष जाधव दिवा शहर कार्याध्यक्ष, शिवश्री. प्रशांत जाधव ठाणे महानगर सचिव, शिवश्री. सत्यवान काशीद ठाणे महानगर संघटक, शिवश्री. विलास उतेकर दिवा शहर संघटक, शिवश्री. महेश गोरिवले दिवा शहर उपाध्यक्ष, शिवश्री. सागर सुरलकर ईशान्य मुंबई जिल्हा संघटक, संतोष वानखडे, अमर पुकाले, भास्कर पवार, मंगेश चव्हाण, संतोष चव्हाण, निहार कांबळे परब, जयेश सुरलकर, सविव गवई आदि मान्यवर उपस्थित होते.शिवश्री. प्रतिक सकपाळ ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष यांनी या उपक्रमाला धावती भेट दिली



