ब्रेकिंग
बारवी धरण भरले, केव्हाही होऊ शकतो पाण्याचा विसर्ग..
0
2
0
9
7
9
अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पाणीपुरवठा स्रोत असलेले बारवी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी १२ वाजता बारवी धरणाची पाण्याची पातळी ७२.४० मीटरवर पोहोचली होती. म्हणजे सध्या धरणात ९७.८३ टक्के इतका पाणीसाठा आहे.धरणाची कमाल पातळी (ओव्हरफ्लो लेव्हल) ७२.६० मीटर आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने आणि पर्जन्यवृष्टी कायम राहिल्यास, येत्या काही तासांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास त्याचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होतो.
0
2
0
9
7
9



