बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शिवसेना दिवा शहराने घडवले हजारो महिलांना एकविरा देवीचं दर्शन,शहरप्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली केलं गेलं दर्शन सोहळ्याचं आयोजन..

अमित जाधव - संपादक

दिवा शहरात शिवसेनेच्या वतीने शुक्रवार दिनांक २१ एप्रिल रोजी एकविरा देवीचं दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना शहरप्रमुख तथा मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या दर्शन सोहळ्यात दिवा शहरातील हजारो महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सकाळी आठ वाजता तब्बल ५० बस व अनेक खाजगी गाड्यांमधून निघालेल्या सर्व महिला अकराच्या सुमारास कार्ला येथे पोहचल्या. खास महिलांसाठी उभारल्या गेलेल्या भल्या मोठ्या मंडपात क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर सर्व महिलांनी देवीच्या गडावर जाऊन एकविरा देवीचं दर्शन घेतले. शिवसेना शहर प्रमुख श्री.रमाकांत मढवी, नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे, शहर अधिकारी युवती सेना कु. साक्षी मढवी, यांनी स्वतः सर्व महिलांसोबत गडावर जाऊन एकविरा आईचं दर्शन घेतल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला बघायला मिळाला. दर्शन झाल्यानंतर महिलांची उत्तम जेवणाची सोय करण्यात आली व त्यांनंतर महिलांच्या मनोरंजनासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात उपस्थित महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमात महिलांना सोन्याची नथ, पैठणी व इतर अनेक बक्षिसं जिंकण्याची संधी उपल्बध करून देण्यात आली होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशहर प्रमुख श्री. गणेश मुंडे, नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे,सौ.सुनीता मुंडे, नगरसेवक श्री.दिपक जाधव, शहर अधिकारी युवती सेना कु. साक्षी मढवी, विभाग प्रमुख श्री.चरणदास म्हात्रे,श्री.शशिकांत पाटील,श्री.विनोद मढवी, उपविभाग प्रमुख श्री. सचिन चौबे, श्री. जगदीश भंडारी, श्री. राजेश पाटील,श्री. सदाशिव पाटील,श्री.शरद पाटील,श्री. तुकाराम मुंडे,शाखाप्रमुख श्री. निलेश म्हात्रे, श्री. गणेश गायकवाड, श्री. संतोष देसाई, श्री. राजेश पाटील, श्री. जयदास शेलार, श्री. महेश पाटील, श्री. मनोज खंडागळे, श्री. भूषण पाटील, श्री. शिवदास पाटील, श्री. सुरेश पाटील, श्री. प्रशांत कदम, श्री. धीरज देशमुख, श्री. राकेश म्हात्रे,केशव पाटील, श्री.श्री. सोपान म्हात्रे, श्री. रुपेश मढवी, श्री. रंदीप मढवी, श्री. संजय म्हात्रे, श्री. संजय भगत, श्री. विठ्ठल घेवडे, श्री.शंकर म्हात्रे,श्री.अरुण म्हात्रे, श्री. विजय भोईर आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. यावेळी नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका दिपाली भगत, उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत, विभाग प्रमुख उमेश भगत, गुरुनाथ पाटील, निलेश पाटील, शैलेश भगत, अर्चना पाटील, अँड.सुप्रिया भगत, भाग्यश्री पाटील आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते. शिवसेना दिवा शहराच्यामुळे आई एकविरा देवीचं दर्शन झाल्यामुळे अनेक महिलांनी रमाकांत मढवी व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे