Breaking
ब्रेकिंग

ठाणे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांचा सर्वसमावेशक डाटा तयार करावा – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांचा सर्वसमावेशक डाटा तयार करावा – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. 3 (जिमाका) – कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षित बेरोजगार तरुणांचा सर्वसमावेशक डाटा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज दिले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक आज श्री. शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जालन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निवेदिता पाटील, प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक डी.बी. घुले, एमजीएमचे जितेंद्र रांजणे, सीआयबीए संस्थेचे प्रसाद मेनन, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जे. एन. भारती, एआयसी संस्थेचे उदय वांकावाला, सूरज पाटील आदी उपस्थित होते.
कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, विभागामार्फत विविध योजनांतर्गत तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. मात्र, त्यानंतर त्या युवकांना स्वयंरोजगार अथवा रोजगार मिळतो का याची माहिती घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यात किती युवक बेरोजगार आहे, या माहितीचा डाटा तयार करण्यात यावा. दरवर्षी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून अनेक तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात, अशा तरुणांची माहिती या डाटामध्ये समाविष्ट करावी. जेणेकरून जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देता येईल. अनेक क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांची आवश्यकता असते. अशी क्षेत्रे हेरून त्याप्रमाणे तरुणांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात नियोजन करावे.
यावेळी मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण, प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण, आरोग्य क्षेत्रातील विशेष प्रकल्प, संकल्प योजना, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास कार्यक्रम आदी योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी उपस्थित कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या सूचना मांडल्या.
श्रीमती साळुंखे यांनी कामकाजाचा आढावा सादर केला.
००००००००००

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे