Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील म्हात्रे गेट मध्ये तात्काळ गतिरोधक बसवा,ठाकरे गटाचे योगेश निकम आक्रमक…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता २१ एप्रिल : दिवा-आगसन रोडवरील विकास म्हात्रे गेट या अत्यंत वर्दीळीच्या परिसरातील रस्त्यावर ठाणे महापालिकेद्वारे लावलेले गतिरोधक गेली गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उखाडले असून पूर्णतः नामशेष झाले असून सदर ठिकाणी तात्काळ नवीन रस्ता गतिरोधक बसविण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे. सदर परिसरात ठाणे महापालिकेचे आरोग्य केंद्र तसेच काही खासगी शाळा असल्यामुळे येथील परिसरात नागरिकांची व शालेय मुलांची वर्दळ असते या रस्त्यावरून अनेक लहान सहान वाहने तसेच मोठमोठे आवजड वाहने जात असतात. त्यामुळे येथील परिसरात आपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग प्रमुख योगेश निकम यांनी निवेदन देऊन लवकरात लवकर नवीन दुभाजक बसविण्याची मागणी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त राजेंद्र गिरी यांना केली आहे. प्रसंगी ठाकरे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे