ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर आढळली संशयित बॅग…..
अमित जाधव-संपादक
ठाणे महानगर पालिका मुख्यालयासमोर आज दिनांक ०३/०६/२०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता गेट नंबर २ समोर, झाडाखाली एक अज्ञात बॅग आढळून आली
ही बॅग कोणाची आहे हे न समजल्याने नौपाडा पोलिसांना कळविण्यात आले अशी आज्ञात बॅग ठाणे महानगर पालिका मुख्यालयासमोर कशी हा थोडा शंकेचा विषय असल्याने ईतर व्यवस्थापना देखील दाखल झाल्या
या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १-जीप वाहन, नौपाडा पोलीस कर्मचारी, ठाणे नगर पोलीस कर्मचारी, बॉम्ब शोधक पथक व श्वान पथक, अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहन व १-रेस्क्यू वाहनासह , बॉम्ब शोधक पथक व श्वानाच्या मदतीने सदरच्या बॅगची तपासणी करण्यात आली असून,
कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची खात्री करून, सदरची “फ्रेश टू होम” या कंपनीची डिलिव्हरी बॅग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी नौपाडा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात दिली आहे.


