बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दातीवली तलाव येथे संरक्षक भिंत कोसळून एक रिक्षा व मोटारसायकल नुकसान… ठाणे आपत्ती व्यवस्थापन यांनी कळविले…

अमित जाधव - संपादक

ठाणे -दिव्यात आज पहाटे च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  आज सकाळी ०६:३० वाजताच्या सुमारास दातिवली तलाव, दातिवली या ठिकाणी तलावाची संरक्षण भिंत अंदाजे २० फूट लांब व ०८ फूट उंच असलेली भिंत तलावामध्ये पडली असून, जवळच पार्क केलेले दुचाकी वाहन व ऑटोरिक्षा पडली होती. सदर घटनास्थळी उप-अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व ठाणे महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  घटनेत कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी तलावाची संरक्षण भिंत पडल्यामुळे दुचाकी वाहन व ऑटो रिक्षाचे नुकसान झाले आहे.
तसेच अडकलेले दुचाकी वाहन व ऑटो-रिक्षा हायड्रा मशीनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहेत.
सदर घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने भिंत पडलेल्या ठिकाणी लोखंडी बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहे.
व तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आले असून, संबंधित विभागाला कार्यवाहीची सूचना देण्यात आली आहे.असे यावेली ठाणे आपत्ती व्यवस्थापन यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे