ऑगस्ट मध्ये येणार इथेनॉल वर चालणारी गाडी, अवघ्या पंधरा रुपयात इंधन उपलब्ध…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमित जाधव - संपादक
भाजपने आज मुंबईत गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. मोदी सरकारच्या ९ वर्षपुर्ती निमित्ताने चर्चेचं आयोजन करण्यात आले होते. या चर्चेला नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली.
यावेळी नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. ऑगस्ट महिन्यात इथेनॉल वर धावणारी गाडी बाजारात आणणार, चारचाकी व दुचाकी वाहने बाजारात येणार, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
गडकरी म्हणाले, ऑगस्टमध्ये टोयोटा गाडी लाँच करणार आहे. ही गाडी १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणार पेट्रोलच्या तुलनेत अवघ्या १५ रुपयांत लीटर इंधन उपलब्ध होईल. प्रदूषण शून्य असणार आहे. स्कूटर व चारचाकी गाड्या देखील बाजारात येणार आहे.
नितीन गडकरी म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेत ३७ करोड लोकांना फायदा झाला. पीएम किसान योजनेच्या ९.६ लोकांना गॅस कनेक्शन मिळाले. जनधन योजनेत ४९ करोड बँक अकाऊंट ओपन झाले. सर्वात गरीब नागरिकाला सन्मानाने उभे करण्याचा या योजनेचे उद्देश आहे.