Breaking
ब्रेकिंग

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहता त्यांना खाऊ पिऊ घालणाऱ्यावर होणार कारवाई…हायकोर्ट

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 4

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हा आता बहुतांश ठिकाणी गंभीर मुद्दा आणि प्रश्न बनलेला आहे. याच पार्श्वभूमीवर या भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्या लोकांची इतर लोकांचे वाद विवाद आणि भांडणांसारखे प्रकार सुद्धा आता घडायला लागलेले आहेत. याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे.या निकालामध्ये नागपूरच्या खंडपीठाने काही महत्त्वाची निरीक्षण नोंदवलेले आहेत. पहिला म्हणजे आता भटक्या कुत्र्यांचा त्रास हा सहनशीलतेच्या पलीकडे पोहोचलेला आहे. भटक्या कुत्रे आणि त्यांची वाढती संख्या लक्षात घेता ते आता हिंसक झालेले आहेत. काही बाबतीत त्यांनी मुलं, माणसं, आणि तान्ह्या बाळांना सुद्धा लक्ष करून त्यांच्यावर हल्ला केलेला आहे.
आता कुत्रा हा मानवाचा उत्तम मित्र असतो म्हणजे आहे. ही जी युक्ती आहे ती पाळीव कुत्र्यांपूर्ती मर्यादित आहे. ती युक्ती भटक्या कुत्र्यांना लागू करता येणार नाही. आता याबाबतीत प्रशासनाचा जे काम आहे ते भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे, याला काही लोक, म्हणजे जे लोक या भटक्या कुत्र्यांना खायला प्यायला घालतात.ते लोक या कामांमध्ये अडथळा निर्माण करत आहेत. उच्च न्यायालयाने अस सुद्धा म्हंटल आहे की, भटक्या कुत्र्यांना खायला घालणारे लोक आपापल्या गाड्या घेऊन विविध परिसरामधल्या कुत्र्यांना खायला घालतात. आणि या पालन पोषणामुळे ते जे भटके कुत्रे आहेत ते तगडे होतात. आणि परिणामी त्यांची हिंसा करायची शक्ती ही वाढत जाते.
पालन पोषण झालेला असल्यामुळे त्यांचा पुनरुत्पादन सुद्धा मोठ्या संख्येने होत परिणामी भटक्या कुत्र्यांची संख्या सुद्धा वाढण्याला या खायला घालण्याचा हातभार लागतो आहे. मुंबई पोलीस कायदा कलम-44 मध्ये भटक्या कुत्र्यांचा जर अति त्रास व्हायला लागला तर अशा भटक्या कुत्र्यांना पकडून ठेवायची किंवा त्यांना नष्ट करायची कायदेशीर तरतूद आहे.
हे सगळं निरीक्षण नोंदवल्यानंतर नागपूरच्या खंडपीठाने असा निकाल दिला, की नागपूर शहरांमध्ये कोणीही भटक्या कुत्र्यांना असं खायला घालू नये. ज्या लोकांना कुत्र्यांप्रती एवढं प्रेम असेल त्यांनी त्या कुत्र्यांना रीतसर दत्तक घ्यावं. त्यांची महापालिकेमध्ये नोंदणी करावी.
आणि त्यांना स्वतःच्या घरी किंवा त्या कुत्र्यांकरताची डॉग शेल्टर किंवा निवारा केंद्र उभारलेली आहेत तिथे त्यांना नेऊन त्यांची देखभाल करावी. त्या देखभालीचा खर्च उचलावा. पण कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालू नये. आणि त्यांनी पोलिस आणि महापालिका प्रशासनाला असे निर्देश दिलेले आहेत, की भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी कोणी खायला घालत असेल तर त्यांना तसं करण्यापासून रोखावं.
आणि वेळेला त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही सुद्धा करण्यात येईल. आता भटक्या कुत्र्यांसंदर्भात या निकालावर अनेक असे काही चांगले वाईट प्रतिसाद येतात. आणि आपल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र आहे प्रत्येकाला असल्यामुळे कौतुक करणं किंवा टीका करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे