शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून 2 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास सलमान खान सारखे होणार असल्याचे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा सांगितले आहे. हा फोन ऑस्ट्रेलियातून आला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता.