Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील प्रगती प्लस क्लासेस चे विद्यार्थी यंदा शहरात टॉपर,शिक्षणाशिवाय भविष्य अशक्य..मुकेश शर्मा सर

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे – मुकेश शर्मा यांनी गेल्या १४ वर्षांपासून दिवा शहरात शिक्षणाला एक नवीन दिशा देण्यासाठी प्रगती प्लस क्लासेस चे माध्यमातून आपला अनुभव आणि मार्गदर्शना च्या जोरावर विद्यार्थ्यांना केवळ उच्चस्तरिय शिक्षणच नाही तर त्यांना करिअरच्या योग्य मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा देत आहेत

त्याचेच फलीत म्हणून आज दिव्यातील कॉमर्स ,सायन्स मधे गेल्या १४ वर्षांपासून, त्यांच्या आणि अनुभवी टीचर्स प्रयत्नांमुळे १००% विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत.मुकेश शर्मा सरांचा अनुभव विद्यार्थ्यांना यशस्वीपणे करिअर मार्गदर्शनासाठी प्रोत्साहन देत आहे. शिक्षणाचे महत्त्व आणि त्याचा उपयोग कसा करावा हे विद्यार्थ्यांच्या पालकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत.
शिक्षण हे भविष्याचे एक परिमाण आहे. शिक्षणाशिवाय भविष्य अशक्य आहे.कितीही अडचणी असल्या तरी विद्यार्थ्यांना उच्चस्तरिय शिक्षण मिळावे या संकल्पनेने त्यांनी प्रगती प्लस क्लासेसची सुरुवात केली आहे. ते स्वत: उच्चशिक्षित असल्यामुळे समाजाचे मूल्य मापन चागलेच समजून विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत आहेत.
प्रगती प्लस क्लासेसच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे ते सातत्याने ते करत असतातं. शिक्षण आणि विकास या समाजाच्या दोन मुलभूत घटकांसाठी ते सदैव कार्यरत असतात. येणार्‍या काळात आणखी काही समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सागितले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे