होय आम्ही आहोत स्टंटबाज, नौटंकीबाज!! डंपिंग विरोधात दिवा भाजप ची सत्ताधाऱ्यांना गोड शब्दात चपराक….
अमित जाधव - संपादक
होय आम्ही आहोत स्टंटबाज, नौटंकीबाज!!
भाजपची एक नवी ओळख करून दिल्याबद्दल दिव्यातील लोकप्रतिनिधीना धन्यवाद. आपण ज्याला नौटंकी, स्टंटबाजी म्हणता ती केल्यामुळेच तर आज भाजप इतकी मोठी होत आहे. ज्याचं उदाहरण आपण आता देशापासून ते कालच्या ग्रामपंचायतींच्या निकालातून बघत आहोत.कारण लोकांना सुद्धा आता तुमच्यासारख्या एकनिष्ठ, इमानदार, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचा तिटकारा येऊ लागला आहे. कारण लोकांना इतकी वर्षे तुम्ही दिव्यात सत्तेत असून इतक्या सुखसुविधा दिल्या की आता त्या त्यांना सहनच होत नाहीत. एवढे वर्षे भरभरून तुम्ही लोकांना नळाद्वारे धो धो पाणी दिलं की आता त्यांना पिण्याच्या पाण्याची गरजच नाही.कामगारवर्ग अखेर extra exercise म्हणून सुटीच्या दिवशी पाईपलाईन जोडतोड करू लागलाय. दिवा डम्पिंग तर खूप सुदंर भेट दिलीआहे. आम्ही आपले आंदोलनाचे स्टंट , नौटंकी करत राहू तेवढेच लोकांचा विरंगुळा. स्वच्छ भारत अभियानात तर आपला उत्तम प्रतिसाद मिळतोय जिकडे तिकडे सार्वजनिक शौचालये दिव्यात उभी आहेत. फक्त ती तुम्ही तोडण्यासाठीच आम्ही बांधली होती.कारण आम्ही स्टंटमेकर आहोत. लोकही आता आमच्यासारख्या स्टंटबाजी करणाऱ्यानाच साथ देत आहेत , म्हणजेच दिवावासीय सुद्धा नौटंकीबाज झाले म्हणायचं. असं असेल तर तुम्ही तुमची वर सांगितल्याप्रमाणे अशीच पक्षनिष्ठा , इमानदारी आणखी वाढवत राहावी, हीच सदिच्छा.