Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नवाब मलिक यांची प्रकृती खालावली,3 दिवसापासून जे जे रुग्णालयात उपचार सूरु…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून गेल्या तीन दिवसांपासून जे जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नवाब मलिक यांच्या वकिलाने कोर्टात सोमवारी ही माहिती दिली.नवाब मलिक यांचे वकील कुशल यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय घरचं जेवण देण्यासाठी जेलमध्ये गेले असता त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं समोर आलं. नवाब मलिक खूप आजारी असल्याचं सांगत कुशल यांनी कोर्टाकडे त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली.

विशेष न्यायमूर्ती आर एन रोकडे यांनी तुरुंग प्रशासनाने नवाब मलिकांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती न दिल्याने तसंच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याने काळजी व्यक्त केली. यानंतर कोर्टाने नवाब मलिकांच्या प्रकृतीविषयी तसंच तिथेच त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात का यासंबंधी रुग्णालयाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. ५ मे पर्यंत हा अहवाल सादर करायचा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे