Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

रेल्वे रुळालगत राहत असलेल्या दिवावासीयांच्या घरावर करवाईकरण्यासाठी आलेल्या रेल्वे पथकाला शिवसेनेने रोखले……..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
रेल्वे रुळालगत घरावंर कारवाई करण्यासाठी आलेल्या रेल्वे पथकाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रोखले.

दिवा पूर्व येथिल रेल्वे रुळालगत असलेल्या अष्टविनायक नगर येथील रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटीस देऊन तोडक कारवाई करण्यासाठी आज रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण विभाग मोठा फौजफाटा घेऊन कारवाई साठी आले असता *खासदार डॉ. श्रीकांत शिंदे* यांनी फोन वरून अधिकाऱ्यांशी बोलन करून कारवाई ला विरोध केला. तसेच माजी उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, रेल्वे प्रवासी संघटनेचे अँड. आदेश भगत, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, सचिन पाटील, समीर पाटील, भूषण म्हात्रे आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कारवाईला विरोध केला.
अशा प्रकारची कारवाई करू नये, रहिवाशांचा पुनर्वसनाचा विषय मार्गी लावल्याशिवाय कारवाई करू दिली जाणार नाही अशी भूमिका स्थानिक *खासदार डॉ श्रीकांत शिंदे* यांनी यापूर्वीच घेतली असून नुकतीच याविषयी रेल्वे राज्यमंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले होते. पुनर्वसन झाल्याशिवाय कारवाई करू देणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे