अखेर तीन दिवसापासून उघड्यावर संसार मांडून बसणाऱ्या खरात ताईंना मिळाला न्याय…,
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 15 ऑगस्ट : दिवा शहरात गेली तीन ते चार दिवसापासून रूम मालकाने एकाच रूमचा व्यवहार दोघांना केल्याने व दुसरा मालक केळशीकर नामक इसमाने दलित महिला रेश्मा खरात यांचे घरसामान बाहेर काढल्याने उघड्यावर आलेला संसार त्यामुळे गेल्या तीन चार दिवसापासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन व संसार करून मालकीच्या रूम हक्कासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करीत आंदोलन करणाऱ्या रेश्मा खरात या महिलेला अखेर न्याय मिळाला आहे. या कठीण परिस्थितीत त्यांनी आपला संसार रस्त्यावर मांडत सदर व्यक्ती विरोधात आक्रमक भूमिका घेऊन रस्ता रोको सारखं आंदोलन करून आंबेडकर चळवळीतील समाजाचा तसेच अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाल्याने तर काही राजकिय पक्षांच्या पाठिंब्याने मला अखेर माझी रूम पुन्हा मिळाली आहे असे त्यांनी यावेळी भाऊक होत बोलताना सांगितले.
मूळ मालक तपन कुमार याने रेश्मा खरात व नंतर सतीश केळशीकर नामक व्यक्तीला काही दिवसापूर्वी रूम विकला असता तो रूम रेश्मा खरात यांना अगोदर विकला आहे व त्यांनी आधीच अगाऊ रक्कम देत तो खरेदी केला असताना व त्या स्वतः रहात देखील होत्या त्यामुळे केळशिकर यांनी काही मित्र मंडळीच्या मध्यस्थीने रूम खाली करून घरसामान रस्त्यावर आणले होते. प्रकरणी दिवा (मुंब्रा) पोलीस स्टेशनचे व. पो. नि. निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके व त्यांच्या टीमने मोलाचे सहकार्य केले. समाजसेवक अमोल केंद्रे यांनी सांगितले की आज १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी रेश्मा खरात ताईला खरा न्याय मिळाला आहे असे स्पष्ट केले.