ब्रेकिंग
दिव्यात शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते महा आरती संपन्न…
अमित जाधव - संपादक

शुक्रवार दिनांक 29/11/2024 रोजी,ठाणे जिल्हा,दिवा पूर्व,समर्थ नगर येथील मोरेश्वर गणपती मंदिरात नवनिर्वाचित आमदार श्री.राजेशजी मोरे यांनी केली ‘गणेशाची महाआरती’ प्रसंगी,मा.नगरसेविका सौ.दिपालीताई भगत,शिवसेना दिवा पूर्व विभाग प्रमुख उमेश अशोक भगत यांनी सदर गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते.त्यावेळेस शिवसेना दिवा शहर प्रमुख मा.रमाकांत मढवी , माजी नगर सेवक श्री.दिपक जाधव,शिवसेना युवती अधिकारी कु.साक्षीताई मढवी यांनीही प्रामुख्याने आपला सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपालीताई भगत आणि उमेश भगत यांच्या शाखेचे शिलेदार,सूर्यकांत कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख) आणि विविध वार्डतील शाखाप्रमुख,भरत शिंत्रे,संतोष पेंढारी,सतिश निकम, अनिल मोरे, उपशाखा प्रमुख,नरेंद्र पाटील, प्रदीप जैस्वाल,महिला शाखा संघटिका, विशाखाताई इंदुलकर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम केले असे यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख सूर्यकांत कदम यांनी कळविले आहे