Breaking
ब्रेकिंग

दिवा स्थानकात सुरू असलेल्या कामामुळे प्रवासियांची गैरसोय.. ऍड आदेश भगत यांनी स्थानक प्रबंधक यांची भेट घेत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल अँड.आदेश भगत यांनी घेतली स्थानक प्रबंधकांची भेट.

दिवा रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पुलावर सुरू असलेल्या लाद्या बसवण्याचे काम हे सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेस न करता रात्री करावे असे सूचना दिवा स्टेशन स्थानक प्रबंधक मनोज गुप्ता यांना देण्यात आली.

याशिवाय सदर काम करता वेळी लावण्यात आलेले लोखंडी पत्री बॅरिगेट्स मुळे प्रवाशांना दुखापत होऊ शकते त्यामुळे तिथे सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच नवीन पादचारी पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशा सूचना यावेळी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आदेश भगत यांनी दिवा स्टेशन स्थानक प्रबंधकांना केली

दिवा रेल्वे स्थानकात सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेस मुंबई दिशेकडील पादचारी पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी असते, अशावेळी पादचारी पुलावर सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. ही बाब प्रवासी संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर व याबाबत प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर अँड.आदेश भगत यांनी स्थानक प्रबंधकांची भेट घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे